भाजपा नेता अरुण जेटली यांची प्रकृती बिघडली, आयसीयू मध्ये दाखल

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांची तब्येत बिघडली आहे. शुक्रवारी दुपारी त्यांना दिल्लीमधील एम्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. अरुण जेटली हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाच्या आयसीयू मध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. अरुण जेटली यांची प्रकृती आता स्थिर आहे.

नियमित चेकअपसाठी अरुण जेटली यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत असलं तरी जेटलींना नक्की कोणता त्रास होत आहे ज्या कारणामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलेले आहे हे स्पष्ट झालेलं नाही. आपल्या माहितीसाठी अरुण जेटली यांच्यावर किडनी ट्रान्सप्लान्टची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात अरुण जेटली यांनी अर्थमंत्री पदाचा कार्यभार सक्षमपणे सांभाळला होता. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर त्यांनी आपल्याला मंत्रिमंडळात घेऊ नये अशी विनंती केली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात नोटबंदी आणि जीएसटी यासारखे महत्वाचे निर्णय अरुण जेटली यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here