शाहिद कपूरचा आदर्श डोळ्या समोर ठेवून ही अभिनेत्री करणार Arrange Marriage

अनके वर्ष शाहिद कपूर हा करीना कपूर सोबत रिलेशनशिप मध्ये होता परंतु ब्रेकअप नंतर त्याने Arrange Marraiage करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने तसे केले देखील. असाच Arrange Marriage करण्याचा निर्णय पूर्वी पासूनच घेतलेली दाक्षिणात्य चित्रपटा प्रमाणेच बॉलिवूड मध्ये देखील आपले अस्तित्व दाखवलेली अभिनेत्री काजल अग्रवाल ने देखील घेतला होता. काजल देखील लवकरच लग्न करणार असल्याच्या बातमी आहे. हल्लीच झालेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये तिने लग्ना बद्दलच्या प्रश्नाला रोखठोक उत्तर दिले.

या प्रश्नाला दिलेल्या उत्तराने अनेकांना आश्चर्य वाटेल कारण काजल अग्रवाल ने अरेंज मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार ती आपल्या आई-वडिलांच्या आवडीच्या मुलांसोबाबत लग्न करणार आहे आणि आपलं आयुष्य आई-वडिलांनी आपल्यासाठी निवडलेल्या जोडीदारा सोबत घालवणार आहे.

अनेक साऊथ फिल्म सोबतच काजल अग्रवाल ने अजय देवगण बरोबर सिंघम फिल्म मध्ये भूमिका केली होती. मागील दोन वर्षा पासून फैन्स तिला लग्ना विषयी विचारत होते. परंतु काजल ने अगोदरच स्पष्ट सांगितलं होत की ती आपला जीवनसाथी फिल्म सोबत कोणताही संबंध नसलेला निवडणार आहे. म्हणजेच ती कोणत्याही कलाकारासोबत, डायरेक्टर किंवा प्रोड्युसर सोबत लग्न करणार नाही हे स्पष्ट होत.

 

View this post on Instagram

 

#popsandme

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

काजल ने साऊथ मध्ये जवळपास सगळ्याच सुपरस्टार सोबत काम केलं आहे. असे असलं तरी कधीही  तिचे अफेयर कोणाही सोबत असल्याची चर्चा कधी झाली नाही. पण अफेयर बद्दल काजल म्हणते तिच्या करियरच्या सुरुवातीला एका नॉन फिल्मी व्यक्ती सोबत तिचे अफेयर होते पण काम वाढत गेल्याने दोघातील दुरावा वाढला आणि नंतर ब्रेकअप झालं. ज्यानंतर तिने पूर्णतः कामावरच लक्ष केंद्रित केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

काजल अग्रवाल ने सांगितलं आहे कि 2020 मध्ये ती लग्न करणार आहे. बातमी अनुसार काजलचा भावी नवरा हा एक बिजनेसमॅन आहे. या मुलाची निवड काजलच्या आई-वडिलांनी केली आहे. काजल ने आपल्या नवऱ्या बद्दलची अपेक्षा अनेक वेळा बोलून दाखवली होती त्यानुसार तिला होणारा नवरा काळजी घेणारा, आध्यात्मिक आणि पझेसिव्ह हवा असे सांगितले होते. या सगळ्या गोष्टी होणाऱ्या भावी नवऱ्या मध्ये दिसल्याने काजलने लग्नासाठी होकार कळवला आहे.

काजल अग्रवालच्या वर्कफ्रण्ट बद्दल सांगायचं झालं तर ती सद्य दोन साऊथ फिल्मच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. काजल आपल्याला ‘इंडियन 2’ आणि ‘मुंबई सागा’ या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. काजल ने साऊथ मध्ये सुपरस्टार रजनीकांत सह इतर अनेक मोठ्या स्टार्स सोबत काम केले आहे.